३:
From: "Aum" thelookoutman@gmail.com
Date: 2007/08/20
Subject: हा श्रावण गळतॊ दूर
To: "Anagha" jaswandi@gmail.com
अनु ......... महिना झाला आज तुला भेटून! खरं तर आज तुला फार म्हणजे फारच मोठी मेल लिहायची असं मी ठरवलं हॊत.... पण आत्ताच कट्ट्यावर टवाळक्या करून आलोय तेव्हा आता काही तात्विक लिखाण करण्याचा मूड नाही.... पुन्हा कधीतरी ...
आज गडकरीच्या कॆफे मधे बसलो होतो ...बाहेर बराच पाऊस लागला होता ..समोर भजी आणि चहा ....आणि महत्वाच म्हणजे ...तू कुठे नोकरी करतोस..तुझा पगार किती या पलीकडे गप्पा मारणारे लोक.... जमून आली महफिल ...तिथे एक कविता ऎकवली तुलाही ऎकवतो....
हा श्रावण गळतॊ दूर
नदिला पूर
तरूवर पक्षी
घन ओलें त्यांतुन
चंद्र दिव्यांची नक्षी....
हा श्रावण वाजवी धून
निळे अस्मान
स्तनांवर गळले
मन सगुण फुलांच्या
मंद क्षितीजी जडले...........
-ग्रेस
तेव्हा आता या फुलातील काट्यांची गोष्ट पुन्हा कधी......
No comments:
Post a Comment