Sunday, September 26, 2010

१:

किती बरं वाटतं निसर्गाच्या सहवासात !

तसं फक्त एका रस्त्याचच काय ते अंतर, रस्ता ओलांडला की आपण सिमेंटच्या रुक्ष जंगलात....
आणि या बाजुला! ...दाट झाडी ! मग ती मुद्दामून लावलेली का असेना ! ...... त्यातून छान रस्ते काढलेले .......मध्येच एखाद छोटसं तळं केलेलं आणि त्यात बदकं पोहताहेत....

ही झाडं, फुलं किती टवटवीत दिसताहेत............आणि माणसही!!

का बरं निसर्गात येउन माझं मन असं प्रसन्न होत असावं?
केवळ जीव घुसमटवून टाकणारया सिमेंटच्या जंगला पासून बदल म्हणून? ?

माणसाला माणूस होउन झाली किती वर्ष? ... लाख? किंवा पन्नास ते साठ हजार ? आणि त्यातली गेली दोन - तीनशे वर्ष सोडली तर आपण निसर्गाच्या बरोबरीनेच, कदाचित त्याच्यावर अवलंबुन असेच रहात होतो की....

वर्षानुवर्ष माझे पूर्वज जे या निसर्गाच्या बरोबरीने राहिले, त्यांच्यातून माझ्यापर्यंत संक्रमित झालेल्या वृत्ती माझ्या अंतर्मनाला साद घालीत असाव्यात काय? ?

म्हणूनच कदाचित, मी जातो माझ्या आजोळी आणि बसतो मागच्या पडवीत, जुन्या जात्यावळ, तेव्हा मला असं भरून येत असावं, माझ्या मागच्या पिढीतून माझ्यामध्ये प्रवाहित झालेल्या कुठल्यातरी वृत्तींन्ना आठवत, जाणवत असावं काहीतरी ...


असच चालत रहावस वाटतय ... क्षितिजा पर्यंत !!
पण हे रस्ते! ते तर वर्तुळाकार आहेत ...परत परत जुन्याच ठिकाणी घेउन जाणार मला.

No comments:

Post a Comment