" मग काय ठरवलस? "
" मला नाही जमणार अनु " ....
डोळ्यांच्या कडा विरघळल्या पाण्यात, मला दिसू नये म्हणून तिनं मान फिरवली, पण पटकन सावरलन स्वत:ला ...हातात हात घेउन सांगावस वाटत होतं तिला की अनु तू मला खूप आवडतेस! अगदी माझ्या आई इतकी.. तिच्यासारखीच आहेस तू निष्पाप, लाघवी आणि माझ्यासाठी जीव ओतणारी.... पण नाही सांगू शकत की थांब माझ्यासाठी म्हणून ....
"मी थांबायला तयार आहे तुझ्यासाठी ..... "
. . . . .
. . . . .
"मी सांगू शकत नाही अनु ...अजुन दोन तीन वर्ष तरी मला लग्न करण शक्य नाही."
" मी थांबेन तीन वर्ष ... "
" पण मला नकोयत गं कुठलीही बंधन ...मला सगळच विचित्र वाटतय, कळत नाही मी कुठे चाललोय .. मी जे करतोय ते किती बरोबर आहे ... पण मला ते करायचय !"
"काय करायचय ?"
"मला जाणून घ्यायचय !"
"पण काय ओम?"
माझ्या जगण्याच प्रयोजन काय ? तू किंवा सगळेच, आपण जसे आहोत तसे का आहोत ? जे घडत ते का घडतं ? कसं घडतं ? मला जाणून घ्यायचय अनु .... "
" तू कारणं देतोयस " ....अर्धवट प्यायलेली लस्सी तिने बाजुला सारली, पर्स उघडून शंभराची नोट ठेवली......
"आज सोडू तुला घरापर्यंत?"
"नको !.... तुला विसरण मला सोप जाणार नाही ओम ....काळजी घे. "
No comments:
Post a Comment