६:
आजी गेली ...........
खरंतर दोन वर्षापूर्वीच ’आजी’ गेली होती,
उरला होता फक्त
निपचित पडलेला मांसाचा गोळा...........
सगळे जमलेत ....
आणि रडताहेत धाय मोकलून,
दोन वर्षांपासून एकही शब्द न उच्चारणाऱ्या आजीसाठी.
किंवा कदाचित .....................
जीवनाच्या अटळ, अंतिम सत्याची जाणीव होऊन.
"असणं" आणि "नसणं" ह्यात कितीसा फरक आहे ? आजी शब्दही न बोलता दोन वर्ष अंथरूणाला खिळुन होती ...ती होती आमच्यात ? आणि आज नाही म्हणजे नेमकं काय झाल ? आज ही माणसं जी इथे येउन रडताहेत त्याना गेल्या दोन वर्षात कधीतरी आजी आठवली असेल का? किंवा या नंतर आठवेल का ?
मृत्यू नंतर माणसाचं अस्तित्वच पुसुन टाकलं जातं का?
जाता जाता जोगळेकर आजोबा बाबांना म्हणाले, "विनायक तुझ्या आईला मूल्यांच्या स्वरूपात जे मिळालं, जे तिने तुला दिलं, ते वाढवणं आणि 'ती'चं अस्तित्व टिकवण यासाठी आवश्यक ते बळ तुला मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना!! "
No comments:
Post a Comment