Sunday, September 26, 2010

६:

आजी गेली ...........
खरंतर दोन वर्षापूर्वीच ’आजी’ गेली होती,
उरला होता फक्त
निपचित पडलेला मांसाचा गोळा...........

सगळे जमलेत ....
आणि रडताहेत धाय मोकलून,
दोन वर्षांपासून एकही शब्द न उच्चारणाऱ्या आजीसाठी.
किंवा कदाचित .....................
जीवनाच्या अटळ, अंतिम सत्याची जाणीव होऊन.


"असणं" आणि "नसणं" ह्यात कितीसा फरक आहे ? आजी शब्दही न बोलता दोन वर्ष अंथरूणाला खिळुन होती ...ती होती आमच्यात ? आणि आज नाही म्हणजे नेमकं काय झाल ? आज ही माणसं जी इथे येउन रडताहेत त्याना गेल्या दोन वर्षात कधीतरी आजी आठवली असेल का? किंवा या नंतर आठवेल का ?

मृत्यू नंतर माणसाचं अस्तित्वच पुसुन टाकलं जातं का?

जाता जाता जोगळेकर आजोबा बाबांना म्हणाले, "विनायक तुझ्या आईला मूल्यांच्या स्वरूपात जे मिळालं, जे तिने तुला दिलं, ते वाढवणं आणि 'ती'चं अस्तित्व टिकवण यासाठी आवश्यक ते बळ तुला मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना!! "
५:

From: "Anagha" jaswandi@gmail.com
Date: 2007/08/24
Subject: Heartfelt
To: "Aum" thelookoutman@gmail.com

Dear Aum,
Hope you r fine…..I am Ok.
(Sorry for the late reply but Gmail has been disabled at office)

I don't know what are you going to write in your 'फुलातील काट्यांची गोष्ट'. But let me share a few things which I was not able to articulate that day…

To be honest, when we first started communicating with each other, I had not set any terms and limits to our relationship…..went with the flow , I guess!! .....I really felt glad to have a friend like u….It's so rare to find a person who is a combination of intellect, wit, honesty…conversing with u was always mentally stimulating, in that sense u were different from other guys ….I felt u r the sort with whom I can share my thoughts and be assured of an unbiased feedback ..U were the person I felt comfortable with ...

Moreover, believe me I realize the importance of what you want to achieve in life and what it means to u…we all live for a dream, rite?? It was rather inappropriate and unfortunate that the episode happened the way it did….but I did not have a choice…in Bertrand Russell's words “To fear love is to fear life, and those who fear life are already three parts dead”

Aum, u r a fine person and I like u for what u r… It has been a beautiful journey...our wavelengths matched (I think so, at least!!)……it wasn’t a conventional goody-goody thing…..we have had debates, arguments, rite??

But that’s part of the charm..

But leaving aside all other practical issues for a while…..what matters the most is what u feel…and if u do not feel the same way, then ok….am fine with it…

Thanks for all the kind words you said about me ……..U will go places, I am sure of it…..my best regards wud always be with u…..

Hows Aaji?....Convery my regards to Kaka-Kaku.

आणि हे सगळं इंग्रजीत लिहिलाय, कारण मराठीतून लिहिल असतं तर कदाचित रडणं आवरल नसतं .........

Take Care. Bye.

- Anagha
४:

"ओम वर्ष झालं आज इंजिनियरिंगचा रिझल्ट लागून ....

"हं !! कळलच नाही ना वर्ष कसं गेलं ते ! ... पण आई, खरंच बरं वाटल तू हा विषय काढलास म्हणून ....बरेच दिवस बोलायच होतं तुझ्याशी...... "

चहाचा कप तिने बाजुला ठेवला उघडलेलं वर्त्मानपत्र तसंच माडीवर टेवलं .. अचानक डोळ्यातून काळजी दाटली.

"ओम मला कल्पना आहे...आमच थोड दुर्लक्षच झालं तुझ्याकडे....पण गेली दोन वर्ष आजीचा आजार तू बघतोयस ...

"काल आले होते का डॉक्टरकाका ?"

"आलेले ...म्हणाले हे आता असच चालायच ... काहीही करू शकत नाही."

"आजीला समजत असेल का गं काही?"

डॉक्टर म्हणतात नाही ....पण समजत असावं रे, माझा आपला आहे विश्वास ....मी सकाळी त्यांच आवरायला जाते ना तेव्हा मला जाणवतं..... त्यांचं शरीर उत्सुक असतं माझ्या स्पर्शासाठी ... आणि ऑफिसला जायच्या आधी जेव्हा घेते त्यांचा हात हातात तेव्हा जाणवतात वेगळीच कंपन ........ "
. . . . .
. . . . .

" काय़ ठरवलयस तू ओम ?"

"विश्वास ठेव ग आई ...."

"विश्वासाचा प्रश्न नाहीये रे ........साग ना काय बोलायच होतं?"

"बरंच काही ..... पण नंतरच बोलू ...पुढच्या रविवारी बाबा टूर वरुन परत आले की .... पण आता नोकरीच बघायची असं ठरवलय .... "

* * * * *
३:

From: "Aum" thelookoutman@gmail.com
Date: 2007/08/20
Subject: हा श्रावण गळतॊ दूर
To: "Anagha" jaswandi@gmail.com

अनु ......... महिना झाला आज तुला भेटून! खरं तर आज तुला फार म्हणजे फारच मोठी मेल लिहायची असं मी ठरवलं हॊत.... पण आत्ताच कट्ट्यावर टवाळक्या करून आलोय तेव्हा आता काही तात्विक लिखाण करण्याचा मूड नाही.... पुन्हा कधीतरी ...

आज गडकरीच्या कॆफे मधे बसलो होतो ...बाहेर बराच पाऊस लागला होता ..समोर भजी आणि चहा ....आणि महत्वाच म्हणजे ...तू कुठे नोकरी करतोस..तुझा पगार किती या पलीकडे गप्पा मारणारे लोक.... जमून आली महफिल ...तिथे एक कविता ऎकवली तुलाही ऎकवतो....

हा श्रावण गळतॊ दूर
नदिला पूर
तरूवर पक्षी
घन ओलें त्यांतुन
चंद्र दिव्यांची नक्षी....

हा श्रावण वाजवी धून
निळे अस्मान
स्तनांवर गळले
मन सगुण फुलांच्या
मंद क्षितीजी जडले...........

-ग्रेस

तेव्हा आता या फुलातील काट्यांची गोष्ट पुन्हा कधी......
२:

" मग काय ठरवलस? "
" मला नाही जमणार अनु " ....

डोळ्यांच्या कडा विरघळल्या पाण्यात, मला दिसू नये म्हणून तिनं मान फिरवली, पण पटकन सावरलन स्वत:ला ...हातात हात घेउन सांगावस वाटत होतं तिला की अनु तू मला खूप आवडतेस! अगदी माझ्या आई इतकी.. तिच्यासारखीच आहेस तू निष्पाप, लाघवी आणि माझ्यासाठी जीव ओतणारी.... पण नाही सांगू शकत की थांब माझ्यासाठी म्हणून ....


"मी थांबायला तयार आहे तुझ्यासाठी ..... "
. . . . .
. . . . .

"मी सांगू शकत नाही अनु ...अजुन दोन तीन वर्ष तरी मला लग्न करण शक्य नाही."

" मी थांबेन तीन वर्ष ... "

" पण मला नकोयत गं कुठलीही बंधन ...मला सगळच विचित्र वाटतय, कळत नाही मी कुठे चाललोय .. मी जे करतोय ते किती बरोबर आहे ... पण मला ते करायचय !"

"काय करायचय ?"

"मला जाणून घ्यायचय !"

"पण काय ओम?"

माझ्या जगण्याच प्रयोजन काय ? तू किंवा सगळेच, आपण जसे आहोत तसे का आहोत ? जे घडत ते का घडतं ? कसं घडतं ? मला जाणून घ्यायचय अनु .... "

" तू कारणं देतोयस " ....अर्धवट प्यायलेली लस्सी तिने बाजुला सारली, पर्स उघडून शंभराची नोट ठेवली......

"आज सोडू तुला घरापर्यंत?"

"नको !.... तुला विसरण मला सोप जाणार नाही ओम ....काळजी घे. "
१:

किती बरं वाटतं निसर्गाच्या सहवासात !

तसं फक्त एका रस्त्याचच काय ते अंतर, रस्ता ओलांडला की आपण सिमेंटच्या रुक्ष जंगलात....
आणि या बाजुला! ...दाट झाडी ! मग ती मुद्दामून लावलेली का असेना ! ...... त्यातून छान रस्ते काढलेले .......मध्येच एखाद छोटसं तळं केलेलं आणि त्यात बदकं पोहताहेत....

ही झाडं, फुलं किती टवटवीत दिसताहेत............आणि माणसही!!

का बरं निसर्गात येउन माझं मन असं प्रसन्न होत असावं?
केवळ जीव घुसमटवून टाकणारया सिमेंटच्या जंगला पासून बदल म्हणून? ?

माणसाला माणूस होउन झाली किती वर्ष? ... लाख? किंवा पन्नास ते साठ हजार ? आणि त्यातली गेली दोन - तीनशे वर्ष सोडली तर आपण निसर्गाच्या बरोबरीनेच, कदाचित त्याच्यावर अवलंबुन असेच रहात होतो की....

वर्षानुवर्ष माझे पूर्वज जे या निसर्गाच्या बरोबरीने राहिले, त्यांच्यातून माझ्यापर्यंत संक्रमित झालेल्या वृत्ती माझ्या अंतर्मनाला साद घालीत असाव्यात काय? ?

म्हणूनच कदाचित, मी जातो माझ्या आजोळी आणि बसतो मागच्या पडवीत, जुन्या जात्यावळ, तेव्हा मला असं भरून येत असावं, माझ्या मागच्या पिढीतून माझ्यामध्ये प्रवाहित झालेल्या कुठल्यातरी वृत्तींन्ना आठवत, जाणवत असावं काहीतरी ...


असच चालत रहावस वाटतय ... क्षितिजा पर्यंत !!
पण हे रस्ते! ते तर वर्तुळाकार आहेत ...परत परत जुन्याच ठिकाणी घेउन जाणार मला.